IND vs ENG | कष्टाचे फळ! लेकाला कसोटी कॅप मिळाली अन् ‘बाप’ सर्वांसमोर ढसाढसा रडला

Sarfaraz Khan Debut:  भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (15 फेब्रुवारी) राजकोटमध्ये (Rajkot) सुरू झाला आहे. या सामन्यात संघातून वगळलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी मुंबईचा फलंदाज सर्फराज खानचे (Sarfaraz Khan) पदार्पण झाले आहे. सर्फराजला कसोटी कॅप ((IND vs ENG ) ) मिळालेली पाहून वडील नौशाद खान खूप भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

अनिल कुंबळेच्या हस्ते आज सर्फरालजा कसोटी पदार्पणाची कॅप दिली गेली, तेव्हा शेजारीच उपस्थित असलेले त्याचे वडील ढसाढसा रडले.

सरफराजला देशांतर्गत क्रिकेटचे ब्रॅडमन म्हटले जाते
दरम्यान सरफराज गेल्या 4 वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. 2022-23 हंगामात त्याने 6 सामने खेळले, ज्यामध्ये या युवा फलंदाजाने 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्या. यानंतर 2021-22 हंगामात सरफराजची सरासरी 122.75 होती. 2019-20 हंगामात सरफराजने 154.66 च्या उत्कृष्ट सरासरीने धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole