जडेजामुळे वादळी खेळी खेळत असलेला सरफराज खान धावबाद, पाहून कॅप्टन रोहितला राग अनावर

ind vs eng : पदार्पणाच्या कसोटीत सरफराज खान (Sarfaraz Khan) शतकाच्या दिशेने वेगाने जात होता. तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या (ind vs eng) धाकड गोलंदाजांचा सामना करताना 48 चेंडूत अर्धशतक ठोकत सरफराज शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. परंतु रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्याशी झालेल्या गैरसमजांमुळे तो धावला आणि मार्क वुडच्या अचूक थ्रोने धावबाद झाला. अशाप्रकारे 66 चेंडूंमध्ये 62 धावा करत ओलसर डोळ्यांनी सरफराज पव्हेलियनला परतला. स्टेडियममध्ये उपस्थित चाहतेही यामुळे निराश झाले. दुसरीकडे, ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित भारतीय कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) प्रतिक्रिया देखील पाहण्यासारखी होती. हिटमॅन ने रागाने आपली टोपी डोक्यातवरुन काढून बाहेर फेकली. रवींद्र जडेजाबद्दलचा त्याचा राग कॅमेर्‍यावर स्पष्टपणे दिसला.

मैदानावर नेमके काय घडले?
निरंजान शाह स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाची काही षटके शिल्लक होती. चार विकेट गमावल्यामुळे 81 षटकांत भारताची धावसंख्या 310 धावा होती. जडेजा त्याच्या चौथ्या कसोटी शतकापासून फक्त एक धाव दूर होता, तर सरफराज 62 धावांवर नाबाद होता. जडेजा शंभरावी धाव करण्यासाठी झगडत होता. इंग्लंडचे गोलंदाज त्याला कोणतीही संधी देत ​​नव्हते.

त्यानंतर जेम्सने अँडरसनच्या षटकांच्या पाचव्या चेंडूवर जडेजाने मध्यभागी एक शॉट खेळला, जो थेट फील्डरकडे गेला. प्रथम, जडेजाने एक धाव घेण्यासाठी सरफराजला बोलावले आणि नंतर त्याचे मत बदलले. चपळ मार्क वुडने नॉन-स्ट्रायकर एंडकडील स्टंपवर अचूक थ्रो मारला. सरफराज तोपर्यंत क्रिजपर्यंत परत येऊ शकला नाही आणि अशाप्रकारे तो धावबाद झाला. सरफराज खानने नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने वादळी डाव खेळला.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज