Murlidhar Mohol | साधेपणा असावा तर असा; मुरलीधर मोहोळ यांनी रांगेत उभा राहून घेतले तांबडी जोगेश्वरीचे दर्शन

Murlidhar Mohol | मराठी नुतन वर्ष अर्थातच गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुणेकर तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. या विशेष दिनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनीही देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी आपल्या साधेपणाने मुरली अण्णांनी लोकांची मने जिंकली.

त्याचे झाले असे की, मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ) हे ग्राम गुढी उभारण्याकरिता तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या इथे गेले होते. यानंतर मोहोळ यांनी तांबडी जोगेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी गेले. त्यावेळी गुढीपाडवा असल्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे मुरलीधर मोहोळही सामान्य नागरिकांप्रमाणे दर्शनासाठी रांगेत उभे ठाकले. त्यांच्या याच साधेपणाने पुन्हा एकदा पुणेकरांची मने जिंकली आहेत. यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत भाजपा नेते हेमंत रासने आणि कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्वरीच्या चरणी माथा टेकवला.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे. हे तिन्ही नेते लोकसभेसाठी जोरदार प्रचार करत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला