IND Vs AFG: टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मा-विराट कोहलीचे पुनरागमन

India vs Afghanistan Team India Squad: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या टी-20 संघात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचं (Virat Kohli) पुनरागमन झालं आहे. रोहित आणि विराट एका वर्षाहून अधिक काळानंतर टी-20 संघात परतले आहेत. रोहित शर्माकडे पुन्हा एकदा संघाची कमान सोपवण्यात आली आहे. शेवटच्या वेळी हे दोन खेळाडू 2022 च्या टी20 विश्वचषकात खेळताना दिसले होते. आता पुन्हा एकदा रोहित शर्मा भारतीय टी20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

2024च्या टी20 विश्वचषकापूर्वी ही मालिका खूप खास आहे
टी20 2024 जूनमध्ये सुरू होईल. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याआधी अफगाणिस्तानसोबतची ही मालिका टीम इंडियासाठी खूप खास आहे. या मालिकेत टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या तयारीची चाचपणी करण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेनंतर 2024 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूला पुढील संघात स्थान मिळेल हे जवळपास निश्चित होईल.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठीही ही टी-20 मालिका खूप महत्त्वाची असेल, कारण या दोन्ही खेळाडूंनी वर्षभरात एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आगामी T20 विश्वचषक 2024 च्या तयारीची चाचपणी करण्याची अफगाणिस्तानविरुद्धची सुवर्णसंधी रोहित-विराटलाही आहे.

रोहित-विराटची चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे
अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीची चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या एक वर्षापासून चाहते टी-20 क्रिकेटमधील या दोन खेळाडूंची वाट पाहत आहेत. मात्र, रोहित-विराट आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसले होते.

अफगाणिस्तान मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ