भारत पराभवाचा वचपा काढणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेसाठी संघ जाहीर, ‘या’ खेळाडूकडे नेतृत्व

Australia Tour Of India: ऑस्ट्रेलियासोबतच्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी काल भारतीय संघ जाहीर करण्यात आला. फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या संघाचा कर्णधार असेल तर पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या तीन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह या वरीष्ठ क्रिकेटपटूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. विशाखापट्टणम व्यतिरिक्त या मालिकेतील सामने तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवले जातील.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक कसे आहे?

– पहिला सामना- 23 नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम

– दुसरा सामना- 26 नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम

– तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी

– चौथा सामना- 01 डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर

– पाचवा सामना- 03 डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : Team India For T-20 Series 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :

मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झम्पा.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली