बावनकुळेंसाठी फडणवीसांची बॅटींग; कसिनोतील फोटोवरून राऊतांची केली धुलाई

Chandrashekhar Bawankule : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचं सांगत एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळेंचे (Chandrashekhar Bawankule) मकाऊ कॅसिनो(Macau Casino) मधील 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आपल्याकडे आहेत असा दावा देखील त्यांनी केला आहे. या फोटोमुळे राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे.

राऊतांच्या या पोस्टवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी या पोस्टमधून राऊतांची विकृत मानसिकता दिसते, असा हल्लाबोल केला. ते म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं असं ते म्हणाले.

संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे बावनकुळे, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. इतकी निराशा योग्य नाही, असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं.व्यक्तिगतपणे लक्ष्य केलं जात आहे यापेक्षा खालची पातळी काय असू शकते. ते असे मॉर्फ केलेले फोटो, कापलेले फोटो पोस्ट करून वाईट आरोप करत आहेत. हे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे,अशी टीकाही फडणवीसांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली