Asian Games: ऋतुराज, तिलकच्या फलंदाजीने बांगलादेशची काढली हवा, भारताचा फायनलमध्ये प्रवेश

Asian Games, India vs Bangladesh Highlights: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने क्रिकेटच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाने बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव केला. आता सुवर्णपदकासाठी भारतीय संघ उद्या (शनिवारी, 07 ऑक्टोबर) खेळणार आहे. जिथे त्यांची स्पर्धा अफगाणिस्तानशी होईल. अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा संघ निर्धारित 20 षटकात केवळ 96 धावा करू शकला. बांगलादेशकडून यष्टीरक्षक जोकर अलीने सर्वाधिक 24 धावा केल्या. तर परवीज होसेन 23 धावा करू शकला. या डावात भारताकडून साई किशोरने सर्वाधिक 3 फलंदाजांना बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतल्या.

बांगलादेशच्या नाममात्र 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रुतुराज गायकवाडने 26 चेंडूत 40 धावा केल्या. या खेळीसाठी त्याने 3 षटकार आणि 4 चौकार मारले. तर तिलक वर्माने 26 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 55 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे भारताने 9.2 षटकातच सामना जिंकला.

https://youtube.com/shorts/_01cdn7KqwU?si=nc_sblDCWldjhix6

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

You May Also Like