Asian Games :  तीरंदाजीमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात ओजस देवतळे आणि ज्योती वेन्नमनं सुवर्णपदक पटकावलं 

Asian Games – आशियाई क्रीडा स्पर्धेत तीरंदाजीमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात ओजस देवतळे आणि ज्योती वेन्नम या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या सुवर्णपदकासह भारताच्या खात्यात 71 पदकं जमा झाली आहेत. (Ojas Devtale and Jyoti Venman win gold in mixed doubles archery).

ही भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेतली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी जकार्ता इथं झालेल्या स्पर्धेत भारताला 69 पदकं मिळाली होती. स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात राम बाबू आणि मंजू राणी यांनी 35 किलोमीटर चालण्याच्या मिश्र प्रकारच्या स्पर्धेत मिळवलेल्या कांस्यपदकानं झाली.

दरम्यान, चीन मधील होंगचौ इथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कालही चमकदार कामगिरी करत, 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कास्य पदकांची कमाई केली. कालचा दिवस मैदानी स्पर्धेतील खेळाडूंनी गाजवला. महिलांच्या भालाफेक स्पर्धेत अन्नु राणीनं सुवर्णपदक पटकावलं(Annu Rani won the gold medal in the women’s javelin event). तर महिलांच्या 5 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत पारुल चौधरीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

पुरुषांच्या डिकॅथलॉन स्पर्धेत रौप्य पदक मिळवत तेजस्विन शंकरनं ऐतिहासिक कामगिरी केली. तसंच पुरुषांच्या ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मोहम्मद अफझल यानं रौप्य पदक मिळवलं.15 सुवर्ण, 26 रौप्य आणि 28 कास्य अशा एकंदर 69 पदकांसह भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

https://www.youtube.com/watch?v=gCfxHtR26Wo

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil

बोगस डॉक्टर्स दाखवून हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ – Kirit Somaiya