एका गुलाम नावापासून मुक्त झालो.. इंडिया नामकरणाच्या प्रकरणावर कंगनाने तोडले अकलेचे तारे

India vs Bharat: भारतात सध्या इंडिया विरुद्ध भारत असा वाद सुरू आहे. विरोधकांनी त्यांच्या गटाचे इंडिया आघाडी (India Alliance) असे नाव ठेवल्याने हा वाद सुरू झाला असून आता सर्वत्र या एकाच विषयाची चर्चा सुरू झाली आहे. इतकच नाही तर नरेंद्र मोदी सरकार संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात इंडिया नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव आणू शकते. यावरुनच सध्या दोन वेगवेगळ्या टोकाचं राजकारण सुरु झालं आहे. त्यातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने यावर बोलतांना तिची एक जूनी पोस्ट रिशेयर केली आहे. ज्यात तिने आधीच इंडियाचं नाव बदलण्यात यावं याबद्दल लिहिलं होतं. 2021 मध्ये ‘गुलाम नाम’ इंडियाला रद्द करायला हवं. त्याऐवजी देशाला ‘भारत’ म्हणायला हवं, असं कंगनाने जुन्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. कंगनानं आता ही पोस्ट रिशेअर करत लिहिले, “आणि काही लोक याला काळी जादू म्हणताय… ही फक्त धूसर बाब आहे प्रिये… सर्वांचे अभिनंदन!! एक गुलाम नावापासून मुक्त झालो आहोत… जय भारत.”

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole