Abhijit Bichukle | डॉक्टरेट मिळवल्यानंतर बिचुकलेंनी केली पवार, फडणवीस आणि शिंदेंची धुलाई

Abhijit Bichukle: अभिजीत बिचुकले यांच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लागली आहे. अभिजीत बिचुकले आता डॉक्टर अभिजीत बिचुकले झाले आहेत. दिल्लीच्या मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना ही पदवी देण्यात आलीये. आजवरचं आर्ट आणि नाट्य क्षेत्रातील कार्य पाहून ही पदवी दिली असल्याचं बिचुकलेंनी सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा अभिजीत बिचुकले हे चर्चेचा विषय ठरले आहेत. दरम्यान डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर बिचुकले यांनी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची धुलाई केली आहे.

‘आझाद मराठी’ला बोलताना बिचुकले म्हणाले, जे लोक स्वार्थ पाहतात ते आपला पक्ष सोडून इकडे तिकडे जातात. पण मी ठामपणे एकटा निवडणूक लढवतो. खरं तर पक्षच वाऱ्यावर असतात. पक्षच जनतेच्या जिवावर आहेत. हीच जनता म्हणजेच माझा पक्ष आहे. मला विश्वास आहे माझी पत्नी अलंकृता बिचुकले ही यंदा लोकसभा गाजवणार आणि मुख्यमंत्री बनून दाखवणार. मी दुसरं कुणावरही विश्वास दाखवू शकत नाही, कारण माझी पत्नी इतर नेत्यांप्रमाणे पळून जाणार नसल्याची अप्रत्यक्ष खोचक टीका बिचुकलेंनी केली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, फडणवीस म्हणाले होते, अजितदादा इज चक्की पिसिंग.. मग पहाटेच का केले किसिंग.. बिचुकलेंचे संपूर्ण वक्तव्य पाहूया खालील व्हिडिओतून..