भारताने ‘इंडिया’ नाव सोडले तर भिकारी पाकिस्तान इंडिया नावावर दावा करणार?

Renaming India to Bharat : संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. यात राज्यघटनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आहे. देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे दिल्लीमध्ये ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या लक्षवेधी बदलामुळे मंगळवारी राजकीय वादंग माजला. प्रेसिडंट ऑफ भारत केल्यानंतर आता प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज बुधवारी निघणार आहेत. या परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. येथूनही इंडिया हा शब्द हटवण्यात आला आहे.

दरम्यान, भारतात या हलचाली सुरु होताच पाकिस्तान इंडिया या नावावर आपला दावा सांगणार असल्याचे वृत्त आहे. ‘साऊथ एशिया इंडेक्स’ यांनी याबाबतचे ट्वीट केले आहेे. केंद्र सरकारने देशाचे नाव बदलल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघातही इंडिया ऐवजी भारत असे नाव बदलावे लागणार आहे. असे झाल्यास पाकिस्तान हे इंडिया या नावावर दावा करणार असून तशी तयारी केली असल्याचे वृत्त साऊथ एशिया इंडेक्सने प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानमधील काही राष्ट्रवादी घटकांनी याआधीदेखील इंडिया हे नाव इंड्स प्रदेशावरून पडलं असल्याचे सांगत दावा केला होता. इंड्स हे नाव सिंधु नदीच्या खोऱ्यावरून पडले. त्याचेच पुढे इंड्सवरून इंडिया असे म्हटले जाऊ लागले.

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole