पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्स घेत कुलदीप बनला आशिया चषकात ‘हा’ विक्रम करणारा केवळ दुसरा भारतीय

Kuldeep Yadav Bowling: आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 फेरीत भारताने पाकिस्तानचा शानदार पद्धतीने 228 धावांनी पराभव केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुलच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने 356 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. यानंतर पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. संपूर्ण डावात पाकिस्तानी फलंदाज संघर्ष करताना दिसले. या सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) शानदार कामगिरी केली.

कुलदीपने पाकिस्तानविरुद्ध 8 षटकांत 25 धावा देत 5 बळी घेतले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे. यासह त्याने युझवेंद्र चहल, अनिल कुंबळे, अमित मिश्रा, सचिन तेंडुलकर आणि के. श्रीकांतची बरोबरी केली आहे. या खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यात दोनदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.

एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत अर्शद अयुब पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेणारा पहिला खेळाडू होता. अर्शदने आशिया कप 1988 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 9 षटकात 21 धावा देऊन 5 बळी घेतले होते. आता 35 वर्षांनंतर कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय आशिया चषकात 5 विकेट्स घेतल्या आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

https://youtube.com/shorts/H091HG5c0C4?si=HDNQWlujXiZkFaxz

महत्त्वाच्या बातम्या-

मन जिंकलंस..! नुकताच बाप बनलेल्या बुमराहला पाकिस्तानी गोलंदाज आफ्रिदीने दिली खास भेट

नाणेफेकीच्या ५ मिनिटांच्या आधी, ‘त्याला’ सांगितलं की..”, Rohit Sharmaचा ‘या’ खेळाडूविषयी मोठा खुलासा

विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज