“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Eknath Shinde On Murlidhar Mohol: महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचाराकरीता आज पुण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली. तर इथं आता भाऊ तात्या कोणी नाही. मुरली अण्णाच निवडून येतील, असे मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी बोलतांना म्हणाले की, गिरीश बापट यांचा वारसा आता यापुढे मुरलीधर मोहोळ यांना चालवायचं आहे. गिरीश बापट यांचं काम गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहिलं आहे. त्यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहे. विधानसभेत ज्या ज्या वेळी अडचण येत होती. त्यावेळी मोठा भाऊ म्हणून त्यांनी मला मदत केली. पुणेकरांचं प्रश्न मांडले. विकासासाठी सातत्याने झटत होते. आता तसाच खासदार पुण्यातून दिल्लीत जाणार आहे.

“इथं आता भाऊ तात्या कोणी नाही, मुरली अण्णाच निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.  मुरलीअण्णांनी बुथ कार्यकर्ता ते खासदारकीसाठी उमेदवार असा प्रदीर्घ प्रवास केला आहे. मोदींनी देखील बुथच्या स्तरावरील कामाचं कौतूक केलं आहे. असं म्हणत मुरलीअण्णांच्या कुटुंबाला पैलवानकीचा वारसा आहे.  महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे.  त्यामुळे पैलवान असल्याने कधी कुठे डाव टाकायचं हे त्यांना माहिती आहे. हा आखाडा तर मुरली मोहोळ जिंकणारच. स्वार्थासाठी आखाडा बदलणारा पैलवान आपल्या पैलवानसमोर टिकणार नाही. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके