भारत 2047 पर्यंत जगात महासत्ता म्हणून उदयास येईल; मेजर जनरल योगेश चौधरी यांचे प्रतिपादन 

पुणे  :- भारताला सर्वांनी एकत्र येऊन शक्तीशाली देश बनविण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आपण आज जरी विकसनशील देश असलो, तरी लवकरच विकसित देश म्हणून जगात नावारुपाला येऊ. सध्याच्या परिस्थितीत भारताची प्रतिमा जगात महसत्ता म्हणून निर्माण होत असून देशाच्या स्वतंत्र्यांच्या शंभर वर्षात म्हणजे 2047 पर्यंत भारत महसत्ता म्हणून उदयास येईल. तेव्हा जगातील प्रत्येक देश भारताकडे महासत्ता म्हणून बघेल, असे प्रतिपादन मेजर जनरल प्रशासकिय विभाग साऊथ कमांड मेजर जनरल योगेश चौधरी यांनी केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्यातर्फे 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित पाचवा  पर्सोना टेक्नो कल्चरल फेस्ट 2023 च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक पद्मश्री मधुर भांडारकर, प्रसिद्ध कलाकार आरोह वेलंकर, कॉसमॉस ग्लोबलच्या पुजा शुक्ला, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी संगीत कला अकादमीचे आदिनाथ मंगेशकर, पर्सोना आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. विरेंद्र शेटे, डॉ. नचिकेत ठाकुर यांच्यासह विविध आदी उपस्थित होते.

यावेळी मेजर जनरल योगेश चौधरी आणि पद्मश्री मधुर भांडारकर यांना पर्सोना ऑफ द ईअर अवॉर्ड 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमी, फाईऩ आर्ट आणि इतर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत पर नृत्यकला सादर केली.

मेजर जनरल योगेश चौधरी म्हणाले, देशाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना आपला वाटा उचलावा. युवक हा देशाचा भविष्य असतो, त्यामुळे त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे वातावरण एमआयटी एडीटी विद्यापीठात आहे. परिणामी देशाच्या धैय्य प्राप्तीला आणि स्वंप्न सिद्धीला चालना मिळेल. सध्याला आपल्या विकासशील देशाच्या यादीतून विकसित देशाच्या रांगेत बसणार आहोत. जागतिक स्तरावर भारत सध्याला शक्तीशाली देश म्हणून नावारुपाला आला आहे. युवकांना स्वंप्न बघावे आणि त्याला पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी. गुरूशिवाय यश मि‍ळत नाही. सोशल मिडियाच्या या युगात युवकांनी स्वत:च्या क्षमता ओळखून आपल्या स्वंप्नांना बळ द्यावे. युवकांनी खेळाची सवय असावी. आपल्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पर्यंत करावे. भारतीय सैन्य बळ आज जगात मजबूत आहे. आम्ही जगात शांतता नांदावी म्हणून कार्य करत आहोत. भारतीय सैन्य दल भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच अग्रेसर असते.

पद्मश्री मधुर भांडारकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट करताना मेहनत आणि सखोल अभ्यास करून केल्यास यश मिळेल. आपल्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासह आवांतर वाचन, लेखन अधिक करावे. स्वत: वर विश्वास असावा. त्यांच्या धैय्यापर्यंत पोहचण्यासाठी मेहनत करत रहावे.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपराला विसरू नका. पर्सोना म्हणजे आपले व्यक्तिमत्व जगासमोर आणणे होय. सगळ्यांवर जगाला शांतीचा संदेश देण्याची ही जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी सत्य संकल्प करावे. देशाला विश्वगुरू करण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करावी. या विद्यापीठाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या कलागुणांना प्रकट करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. मातृदेव, पितृदेव, आचार्यादेवो भव ही भारतीय संस्कृती आहे. प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव यांनी प्रस्तावना सादर केली. प्रा. डॉ. अशोक घुगे, स्वप्निल सिरसाट आणि प्रा. स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विरेंद्र शेटे यांनी आभार मानले.