‘भरपूर गुंतवणूक केल्यानंतर तिचे नखरे पूर्ण झाले’, अंकिता लोखंडेच्या सासूचं धक्कादायक वक्तव्य

अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तिचा पती विकी जैनसोबत (Vicky Jain) ‘बिग बॉस 17’ मध्ये प्रवेश केला होता. अंकिताने एकदा सांगितले होते की ती तिच्या पतीसोबत बिग बॉसच्या (Big Boss 17) घरात जात आहे जेणेकरून तिला त्याच्यासोबत घालवायला खूप वेळ मिळेल. जिथे ती तिच्या नवऱ्याच्या जवळ राहू शकेल. मात्र, शेवटचे काही एपिसोड पाहिल्यानंतर असे दिसते की अंकिताचा संपूर्ण प्लान फसला आहे. एकमेकांच्या भांडणांमुळे हे जोडपे सतत चर्चेत असते. दोघांची भांडणे पाहून विकी जैनची आई (Vicky Jain Mother) रंजना जैन (Ranjana Jain) यांनी नुकतेच एका मुलाखतीत खुलासा केला आहे की तिचे कुटुंब अंकिता आणि विकीच्या लग्नाला तयार नव्हते. यासोबतच तिच्या सासूने अंकितावर इतरही अनेक आरोप केले आहेत.

आता विकीच्या आईने मुलाच्या ‘इन्वेस्टमेंट’च्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. अंकिताशी लग्न करणं म्हणजे ही एक प्रकारची गुंतवणूकच आहे, असं विकीने बिग बॉसच्या घरात म्हटलं होतं. त्यावरून रंजना जैन यांना प्रश्न विचारण्यात आला.

“तिच्या जागी दुसरी कोणी असती तर..”
मुलाच्या कमेंटवर बोलताना त्या म्हणाल्या, “हिरोईनला मिळवायचं असेल तर मेहनत करावी लागतेच. ती सहजतेने तुमच्याकडे येत नाही. गुंतवणूक तर खूप करावी लागते, तेव्हा जाऊन ती भेटते आणि बराच पैसाही गमवावा लागतो, तेव्हा तिचे नखरे पूर्ण होतात.” विकी हा अंकितामुळेच बिग बॉसमध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर हे शक्य झालं नसतं, असंही त्यांनी मान्य केलंय.

“अंकितामुळेच विकी बिग बॉसच्या घरात”
अंकिताबद्दल त्या पुढे म्हणाल्या, “ती खूप चांगली सून आहे आणि तिच्यात ते सर्व गुण आहेत. म्हणूनच मी म्हणते की ती व्यक्ती म्हणून चांगली आहे. आम्ही अंकितासाठीच विकीला बिग बॉसच्या घरात पाठवलं होतं. विकी एकटाच बिग बॉसच्या घरात जाऊ शकला नसता. या शोमध्ये तो अंकितामुळेच आहे. सर्वसामान्य मुलगी विकीचं मन जिंकू शकली नसती. अंकिताने ते करून दाखवलं. दोघांनी याआधी स्मार्ट जोडीचा शोसुद्धा जिंकला होता. आमच्याकडे विकीसाठी बरेच प्रपोजल्स आले होते, पण आम्ही त्या सगळ्यांना नकार दिला होता. जे विकी म्हणेल तेच होईल. त्यामुळे आता त्यानेच पसंत केलंय तर त्यालाच ते नातं सांभाळू द्या.”

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक