Ind Vs NZ : विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला इतिहास बदलावा लागेल, आजपर्यंत कोणताही संघ ‘हे’ करू शकलेला नाही

Ind Vs NZ : टीम इंडियाचा एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आतापर्यंतचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली आहे. लीग टप्प्यातील हा एकमेव संघ होता ज्याने एकही सामना गमावला नाही आणि गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले. आता टीम इंडिया (Team India)  वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यापासून दोन पावले दूर आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारताला यावेळी चॅम्पियन व्हायचे असेल तर इतिहास बदलावा लागेल.

यावेळी एकदिवसीय विश्वचषकाचे साखळी सामने राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवले गेले. राऊंड रॉबिन प्रकारात, साखळी टप्प्यात सर्व संघ एकमेकांसमोर येतात आणि गुणतालिकेत अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतात. विश्वचषकाच्या इतिहासात ही तिसरी वेळ होती जेव्हा साखळी सामने राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवले गेले. पण क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत राऊंड रॉबिन प्रकारात अव्वल स्थानावर राहून जेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी भारत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे, त्यामुळे चॅम्पियन व्हायचे असेल तर हा इतिहास बदलावा लागेल.

एकदिवसीय विश्वचषक प्रथम 1992 मध्ये राऊंड रॉबिन स्वरूपात खेळला गेला. या विश्वचषकात न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता, पण उपांत्य फेरीतील सामना हरला आणि स्पर्धेबाहेर पडला. त्याच वेळी, 2019 विश्वचषक देखील राऊंड रॉबिन स्वरूपात खेळला गेला. या विश्वचषकात भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. पण सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन टीम इंडियाही बाहेर पडली. टीम इंडियाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळीही न्यूझीलंडचा सामना भारताशी होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण 117 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 59 सामने जिंकले असून न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. सात सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत राहिला. त्याचबरोबर, एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये 10 सामने झाले आहेत. यापैकी किवी संघाने 5 सामने जिंकले असून भारताने 4 सामने जिंकले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत