Indian Cricketer Death | भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचे निधन, बीसीसीआयने व्यक्त केले दु:ख

Indian Cricketer Death : मंगळवार 13 फेब्रुवारी हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासासाठी अत्यंत दु:खद दिवस होता. या दिवशी देशासाठी 11 कसोटी सामने खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला. 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणारे दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaikwad) यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. ते भारतातील सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू देखील होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने 1957-58 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. बीसीसीआयनेही त्यांच्या निधनावर शोक (Indian Cricketer Death) व्यक्त केला आहे.

दत्ताजीराव गायकवाड यांच्या निधनाबद्दल बीसीसीआय श्रद्धांजली अर्पण करते, असे बोर्डाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. ते भारताकडून खेळणाऱ्या अंशुमन गायकवाड या आणखी एका क्रिकेटरचे वडील होते. त्यांनी 1952 साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि ते बडोद्याच्या राजघराण्यातून आले होते. दत्ताजींनी शेवटचा कसोटी सामना 1961 मध्ये खेळला होता. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

दत्ताजीरावांची कारकीर्द कशी होती?
दत्ताजीरावांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 11 कसोटी सामन्यांमध्ये 350 धावा केल्या. या काळात त्यांच्या बॅटमधून एक अर्धशतक निघाले. 52 ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती. 1959 च्या इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यावर त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. तर त्यांची फर्स्ट क्लास कारकीर्द अगदी उलट होती. दत्ताजीरावांनी 110 सामन्यात 5788 धावा केल्या. प्रथम श्रेणीत त्यांच्या नावावर 17 शतके आणि 23 अर्धशतके आहेत. नाबाद 249 धावा ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती. प्रथम श्रेणीत गोलंदाजी करताना त्यांनी 25 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

मुलाने वडिलांना मागे टाकले
दत्ताजीरावांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी आणि विशेष नव्हती पण त्यांचा मुलगा अंशुमन गायकवाड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावले. त्याने आपल्या वडिलांचे उत्तराधिकारी बनून भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. अंशुमन गायकवाडच्या नावावर कसोटीत 1985 धावा आहेत ज्यात 2 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 201 धावा होती आणि त्याने 2 बळीही घेतले होते. एकदिवसीय सामन्यात अंशुमनने 269 धावा केल्या आणि 78 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. अंशुमन गायकवाडने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 206 सामने खेळताना 12136 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया