Mangal Prabhat Lodha | आदिवासी धर्मांतरणाचा मुद्दा पुन्हा विधीमंडळात गाजला;  मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात मांडला अहवाल

Mangal Prabhat Lodha : महाराष्ट्रातील आयटीआय संस्थांमध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारी आणि आदिवासी समाजातून धर्मांतरण करून अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिले होते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये २०२३ सालातील प्रवेश प्रक्रियेमध्ये आदिवासी प्रशिक्षणार्थींनी घेतलेल्या सवलतींच्या लाभामध्ये झालेल्या अनियमततेचा अभ्यास करण्यासाठीया समितीचे गठन करण्यात आले होते. आज या समितीचा अहवाल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला.

हा अहवाल बनवताना गठीत केलेल्या समितीने अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या १३८५८ विद्यार्थ्यांची माहिती तपासली आणि यावेळी काही महत्वपूर्ण बाबी समोर आल्या. या १३८५८ विद्यार्थ्यांपैकी २५७ विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्म नोंदवलेले आहेत. ही बाब गंभीर असून, त्यासाठी पुढीलप्रमाणे उपायोजना करण्यात येणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

१. वरील सर्व २५७ विद्यार्थ्यांचा तपशील घेण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी गठीत केलेली समिती संबंधित औद्योगिक प्रशासकीय संस्था, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ग्रामसभा इत्यादी ठिकाणी भेट देईल आणि अहवाल सादर करेल.

२. धर्म बदललेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती ग्राह्य धरल्या जातील का? याबाबत समितीने सर्वंकष अभ्यास करून उपाययोजना सुचवाव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’