Pratibha Patil | देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना ताप आणि छातीत जंतुसंसर्ग झाल्याने उपचारासाठी महाराष्ट्रातील पुणे शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ८९ वर्षीय पाटील यांना बुधवारी येथील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांना काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यांना ताप तसेच छातीत जंतुसंसर्ग झाला होता. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यात येत आहे.

प्रतिभा पाटील या भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. 2007 ते 2012 पर्यंत त्यांनी सर्वोच्च घटनात्मक पद भूषवले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार