आज काहीतरी टेस्टी अन् हेल्दी खा! सफरचंदचा हलवा तोंडाला आणेल पाणी, पाहा रेसिपी

Indian Dessert Apple Halwa Recipe: ताजी फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक तत्त्वे आढळतात, ज्यामुळे त्वचा सुधारण्यासोबतच अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. या फळांमध्ये सफरचंद (Apple) हे अतिशय पौष्टिक मानले जाते. रोज नाश्त्यात सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. मात्र, रोज सफरचंद खाणे कंटाळवाणे वाटू शकते. (Recipe Of The Day)

मुले सहसा फळे विशेषतः सफरचंद खाण्यास नकार देतात. वृद्धांना सफरचंद चावून खाण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे बाजारातून आलेले सफरचंद सुकतात आणि त्यांचा ताजेपणा हरवून बसतात. जर तुमच्या घरीही सफरचंद असतील आणि ते कोणी खात नसेल तर सफरचंदाची स्वादिष्ट डिश बनवा आणि सर्वांना सर्व्ह करा. येथे तुम्हाला सफरचंदाचा हलवा (Apple Halwa) बनवण्याची पद्धत सांगितली जात आहे. सफरचंदाची खीर किंवा सफरचंदाचा हलवा चविष्ट तर होईलच, शिवाय निमोनियासह अनेक आजारांपासूनही तुमचे संरक्षणही करेल.

सफरचंद हलवा बनवण्यासाठी साहित्य (Ingredients)
पाच सफरचंद, दोन मोठे चमचे तूप, पाच चमचे साखर, एक कप फुल क्रीम दूध, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, दोन चमचे नारळ पावडर, ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर.

सफरचंदाचा हलवा बनवण्याची रेसिपी (Recipe)

स्टेप 1- सफरचंद हलवा बनवण्यासाठी, प्रथम सफरचंद सोलून घ्या.
स्टेप 2- आता सफरचंदाचे छोटे तुकडे करा.
स्टेप 3- कढईत तूप गरम करा. आता त्यात बदाम टाका आणि हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि बाजूला ठेवा.
स्टेप 4- त्याच पॅनमध्ये चिरलेली सफरचंद ठेवा आणि मध्यम आचेवर पाच मिनिटे शिजवा.
स्टेप 5- पॅनमध्ये दूध घाला आणि मंद आचेवर 15 मिनिटे शिजवा. दरम्यान, मिश्रण ढवळत राहा.
स्टेप 6- सफरचंदाचे तुकडे दुधात फोडत राहा. आता साखर घाला.
स्टेप 7- काही मिनिटांनंतर दालचिनी पावडर, नारळ पावडर आणि ड्रायफ्रुट्स घाला.
स्टेप 8- मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगले भाजल्यावर गॅस बंद करा.
स्टेप 9- एका भांड्यात हलवा सर्व्ह करा, वर भाजलेल्या बदामांनी सजवा.
चवदार आणि आरोग्यदायी सफरचंद हलवा तयार आहे.