जरांगेंना पाठींबा देणाऱ्या आणि शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधव यांच्यावर शाई फेक

Namdev Jadhav : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पवारांवर सततचे आरोप केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे.

दरम्यान, पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. नामदेव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करीत होते. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे होणाऱ्या नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता तसेच त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-