आयपीएल २०२२ लिलाव ! ‘या’ खेळांडूनावर संघांची नजर, यावर्षी पैशाचा पाऊस पडणार

मुंबई : आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. अशातच आता क्रिकेट प्रेमींना आयपीएलच्या लिलावाची उत्सुकता लागून आहे. आयपीएल २०२२ साठी खेळांडूची लिलाव प्रक्रिया १२ आणि १३ फेब्रुवारी होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दहा संघ मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे या लिलावात कोणता खेळाडू मालामाल होणार याकडे चाहत्याचं लक्ष लागून आहे.

आयपीएल २०२२ साठी एकुण १,२१४ खेळांडूनी नोंदणी केली आहे. मात्र या खेळांडुच्या यादीला बीसीसीआयने कात्री लावत ५९० खेळांडूची यादी जाहीर केली आहे. यापैकी २२८ खेळांडूकडे आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव आहे तर ३५५ खेळांडूकडे सध्या आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव नाही.

भारतीय संघातील खेळांडूवर या लिलावात मोठं लक्ष असणार आहे. अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयश अय्यर, यजुवेंद्र चहल, अश्विन, भुवनेश्वर कुमार, इशान किशान, कृणाल पांड्या, हर्षल पटेल, कुलदीप यादव, सुरेश रैना, दिपक हुड्डा या खेळाडूंनावर पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन संघाचा समावेश करण्यात आल्याने यावेळी लिलाव प्रकियात मोठी चुरस दिसणार आहे.

विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतर रॉयल चँलेंजर्स बंगळुरू संघ नवीन कर्णधार शोधण्याच्या तयारीत आहे. त्याचसोबत पंजाब किंग्ज, कोलकत्ता किंग रायडर्स हे संघ देखील आपल्या कर्णधाराच्या शोधत आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूंना देखील चांगला भाव या लिलावात मिळण्याची शक्यता आहे.