अरेरे! लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी अर्जुन तेंडूलकरला चावला कुत्रा, कशी आहे तब्येत?

मुंबई- आयपीएल 2023 मधील लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यातील सामन्यापूर्वी एक मोठी घटना समोर आली आहे. मुंबईचा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tenduljar) कुत्रा चावला आहे. लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये संघाच्या खेळाडूंना भेटत असताना अर्जुननेच (Arjun Tendulkar Bitten By Dog) या घटनेचा खुलासा केला. डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा भाग आहे.

लखनऊने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर लखनऊचे दोन खेळाडू युद्धवीर सिंग चरक आणि मोहसिन खानला भेटताना दिसत आहे. या भेटीत तो त्या दोघांना सांगत आहे की, त्याला कुत्रा चावला (Dog Bites Arjun Tendulkar) आहे.

आता प्रश्न असा आहे की अर्जुनवर कुत्र्याने कधी हल्ला केला? उत्तरादाखल त्याने असे सांगितले की, एक दिवसापूर्वी. अर्जुन तेंडुलकरची प्रकृती जाणून घेतल्यानंतर युधवीर सिंग आणि मोहसिन खान या दोघांनीही त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले. व्हिडीओ पाहिल्यावर कुत्र्याने अर्जुनच्या डाव्या हाताला चावा घेतल्याचे समजते. दुखापतीच्या खुणा त्याच्या बोटांजवळच आहेत. ते मार्क्स इतके खोल नाहीत ही सुखद बाब आहे. कारण जर कुत्र्याने त्याचा खोलवर चावा घेतला असता तर तो नेटवर गोलंदाजी करताना दिसणार नाही.