Ramdas Athawale | सुनेत्रा पवारांकडे खूप चांगले आहे गुण तरी म्हणता बाहेरची सून, आठवलेंचा शरद पवारांना टोला

Ramdas Athawale | महाराष्ट्रात भाजप प्राणित आघाडीची ताकद वाढली आहे. सुनेत्रा पवारांकडे (Sunetra Pawar) खूप चांगले आहे गुण तरी म्हणता बाहेरची आहे सून अशा शब्दांत रामदास आठवले यांनी शरद पवारांना टोला लगावत  सुनेत्रा ताईंच्या  विजयाचा महिना आहे जून आणि  अजितदादा भेटतील बारामतीकरांचे ऋण असे म्हणत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला.

बारामती लोकसभा (Baramati LokSabha 2024) मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्या नतर आयोजित सभेत आठवले बोलत होते. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले,  सुप्रिया सुळे यांचं लग्न झालं असून त्या सुळे कुटुंबामध्ये गेलेल्या आहेत, तर सुनेत्रा ताईंचं लग्न होऊन ते पवार कुटुंबात आलेले आहेत त्यामुळे त्यांना बाहेरच कसं म्हणायचं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत 1998 साली  37 – 38 उमेदवार निवडून आल्यानंतर देखील काँग्रेसने  त्यांना काढून टाकलं तेव्हा त्यांनी सोनिया गांधी या बाहेरच्या आहेत असं म्हणून काँग्रेस सोबत फारकत घेतली होती.  शरद पवार महायुती सोबत आले असते तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नसती, विकासासाठी शरद पवारांनी मोदी साहेबांसोबत येणं अपेक्षित होतं मात्र  त्यांनी तो घेतला नाही असं देखील रामदास आठवले यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात