आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा आदर्श घालून दिला

पालम/विनायक आंधळे – पालम (Palam) तालुक्यातील पेठपिंपळगाव मधील पोचम्मा यल्लमा गायकवाड (४१) आणि त्यांची मुलगी रूपाली पोचम्मा गायकवाड (१६) यांच्या अंगावर वीज पडून निधन झाले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर अशी घटना घडल्याने गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांनी संवेदनशीलता दाखवत मयतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आपुलकीने विचारपूस केली. मयत व्यक्ती नोंदणीकृत ऊसतोड कामगार (Sugarcane Worker) असल्याने त्याचा शासनाकडे पाठपुरावा करून 8 लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश पालम तहसीलदार प्रतिभा गोरे (Pratibha Gore) यांच्या उपस्थितीत संबंधित कुटुंबियांना देण्यात आला.

तसेच, नैसर्गिक आपत्ती पुढे हातबल झालेल्या या कुटुंबाला आमदार गुट्टे यांनी स्वतः आर्थिक मदत केली. यावेळी, रासप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य गणेश रोकडे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, पालम तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, माजी सभापती गणेशराव घोरपडे, रासप जिल्हाउपाध्यक्ष बाबासाहेब ऍंगडे, गणेश हत्तीअंबिरे, विजय शिंदे, उत्तमराव शिंदे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.