IPL 2024 | ‘यंदाही आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकणे अशक्य’, केकेआरविरुद्धच्या खराब गोलंदाजीवरुन दिग्गजाने साधला निशाणा

आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला केकेआर विरुद्धच्या एकतर्फी सामन्यात 7 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीचे गोलंदाज 183 धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरले. केकेआरच्या फलंदाजांनी केवळ 16.5 षटकांत लक्ष्य गाठले. आरसीबीच्या या खराब कामगिरीवरुन इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी आरसीबीच्या पराभवाबद्दल मोठे विधान केले आहे.

केकेआर विरुद्ध आरसीबीच्या पराभवानंतर मायकेल वॉन यांनी ट्विट केले की, “या गोलंदाजी फळीसोबत आरसीबीसाठी आयपीएल ट्रॉफी (IPL 2024) जिंकणे अशक्य आहे.” कोलकाताच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांना चिन्नास्वामीच्या मैदानावर जोरदारपणे पराभूत केले.”

गोलंदाजांनी भयंकर धावा लुटल्या
आरसीबीच्या गोलंदाजांनी केकेआर विरुद्ध जोरदार धावा दिल्या. मोहम्मद सिराज आपला चार षटकांचा कोटा पूर्ण करू शकला नाही आणि 3 षटकांत 46 धावा खर्च केल्या. यश दयालने 4 षटकांत 46 धावा केल्या, तर अल्जारी जोसेफने 2 षटकांत 34 धावा दिल्या.

कोहलीचा मजबूत डाव व्यर्थ ठरला
आरसीबीकडून विराट कोहलीने फलंदाजीत मोठे योगदान दिले. त्याने 83 धावांचा स्फोटक डाव खेळला. त्याच्या डावात विराटने 4 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार मारले. कोहली व्यतिरिक्त, कॅमेरून ग्रीनने आरसीबीकडून 21 चेंडूंत 33 धावा केल्या, तर दिनेश कार्तिकने अंतिम षटकात 8 चेंडूवर 20 धावा केल्या. मात्र त्यांच्या खेळी व्यर्थ ठरल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल