10 रुपये तरी आहेत का खिशात निघाला 10 लाखांची गाडी घ्यायला, suv खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा सेल्समनकडून अपमान मग झालं असं

एखाद्या व्यक्तीला त्यांच्या कपड्यांवरून किंवा त्यांच्या राहणीमानावरुन आपण तो कसा आहे हे ठरवितो आणि तेथेच आपली चूक होते. अनेकदा आपण अशा रंजक कथा देखील पाहतो की एखादा साधे कपडे घालणारा माणूस मोठ्या कोणत्या एखाद्या शो रूममध्ये जातो आणि काहीतरी विकत घेण्यासाठी विचारतो, तो दुकानदार किंवा तेथील सेल्समन त्या माणसाचे कपडे पाहून त्या माणसांची लायकी काढली जाते. मग मात्र तो माणूस चिडतो आणि जी वस्तु त्याला आवडली ती एक रक्कम देऊन  खरेदी करतो.

अशा अनेक रंजक कथा आपण पहिल्या आहेत.असाच एक किस्सा हुबळी कर्नाटकामध्ये घडला आणि देशभरात यांची चर्चा झाली. तूमकुरमधील एक शेतकरी एका चार चाकी वाहनांच्या शोरूम मध्ये गेले,त्यांना एक suv गाडी घ्यायची होती. त्यांनी तिथल्या सेल्समनला विचारलं गाडी घ्यायची आहे, माहिती द्या, त्या शेकऱ्याकडे पाहत तिथल्या दोन – तीन सेल्समनने त्यांची चेष्टा केली. 10 लाख दूर राहिले, खिशात दहा रुपये तरी आहेत का? असं म्हणत केम्पेगौडा या शेतकऱ्यांची चेष्टा केली.

जर तुम्ही अर्ध्या तासात 10 लाख रुपये रोख घेऊन या, गाडीची डिलिव्हरी एका दिवसांत देऊ. असं तो सेल्समन म्हणाला. केम्पेगौडा यांनी त्यांच्या मित्राला फोन लावला अर्ध्या तासात त्याच्या मित्राने पैसे जमा केले. त्या सेल्समनला 24 तासात डिलिव्हरी दे असं सांगितलं. सेल्समन अवाक झाला. डिलिव्हरी देण्यासाठी किमान 3 दिवस लागतील असं सांगितलं. केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र नाराज झाले, त्यांनी त्या सेल्समन विरोधात पोलिसांत तक्रार केली.

अनेक शेतकऱ्यांनी मिळून शोरूमला घेराव घातला. पोलिसांनी कशीबशी त्यांची समजूत काढली.सेल्समनआणि शो रूमने माझा अपमान केला आहे, मला कार नको,लिखित माफी हवी. असं केम्पेगौडा यांनी पोलिसांना सांगितलं. जर माफी नाही मागितली तर आंदोलन करू असा इशारा दिला. त्या सेल्समनने लिखित माफी मागितली. केम्पेगौडा यांची सुपारीची शेती आहे.