महाराष्ट्रात अवघे सत्तेचे भोगी आहेत म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का ?

मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशमध्ये ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित केली गेली. यावर अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माविआ सरकारवर (MVA) टीका केली. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’, असे राज ठाकरे म्हणाले होते.

ठाकरेंच्या या टीकेवर आता काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सवाल उपस्थित केला आहे. सचिन सावंत यांनी ट्विटर द्वारे (Twitter) हा प्रश्न उपस्थित केला आहे. संत परंपरेच्या महाराष्ट्रात कोणीच योगी नाही असे म्हणणे आणि महाराष्ट्रात अवघे सत्तेचे भोगी आहेत म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का ? स्वार्थापोटी धर्माचा वापर करणाऱ्यांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात
अल्प असे ज्ञान। अंगीं ताठा अभिमान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।। असं सावंत यांनी म्हटले आहे.