….म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानायला पाहिजेत; असीम सरोदे यांनी केलं मोदींचे कौतुक

  पुणे –  वकील असीम सरोदे (Asim sarode) हे मानवाधिकार कार्यकर्ते (Human rights activists) आहेत. अनेक लोकहिताचे खटले त्यांनी लढवले आहेत. राष्ट्रीय हरित प्राधिकरणापुढेही त्यांनी अनेक खटल्यांचे काम पहिले आहे.केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात ते नेहमीच आवाज बुलंद करत असतात मात्र यावेळी त्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांचे कौतुक केले आहे. आर्मड् फॉर्सेस स्पेसिअल पॉवर ऍक्ट (अफस्पा) हा कायदा रद्द करण्याचे आश्वासन मोदींनी दिल्यानंतर  सरोदे यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये (Facebook post)  ते म्हणतात, आर्मड् फॉर्सेस स्पेसिअल पॉवर ऍक्ट (AFSPA) हा कायदा खूप अत्याचार करणारा व सुरक्षा जवानांना राक्षसी अधिकार देणारा आहे. हा कायदा पूर्ण रद्द करणार असे नरेंद्र मोदी म्हणालेत त्यांचे जाहीर आभार. आसाम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल, नागालँड, त्रिपुरा असा ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये या कायद्याचा गैर उपयोग करून सैन्याने सामान्य माणसांवर अगणित अत्याचार व स्त्रियांवर बलात्कार केलेत.

आता या सात राज्यांमधून भारताच्या बाजूने असलेल्या भूभागावरून हा कायदा निष्प्रभ व रद्द केला जाणार आहे. तसेच अफस्पा कायदा या सात राज्यांमधून पूर्ण मागे घेण्यात येईल असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे ही अत्यंत महत्वाची घोषणा आहे. आर्मड् फॉर्सेस स्पेसिअल पॉवर ऍक्ट (अफस्पा) कायदा रद्द करून त्याजागी तसाच दुसरा क्रूर कायदा आणू नये म्हणजे झाले.

आर्मड् फॉर्सेस स्पेसिअल पॉवर ऍक्ट (अफस्पा) हा अमानुष कायदा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी व त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानायला पाहिजेत. केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे असे साधारणतः 38 कायदे आहेत जे नैसर्गिक न्यायाचे तत्व गुंडाळून ठेवतात, जे राक्षसी व अमानुष आहेत ते सगळेच केंद्र व राज्य सरकारने रद्द करण्याचा विचार करावा असेही वाटते. असं ते म्हणाले आहेत.