‘शिवसेनेचा ‘पोपट’ लवकरच पिंजऱ्यात जाईल असं दिसतंय..!’

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भ्रष्ट्राचाराच्या (Corruption) विरोधात ईडीने (ED) कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे.  यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey)यांच्या मेव्हण्यावर ईडीने कारवाई केली होती. यानंतर आता  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्या अटकेची मागणी करत आहेत. दरम्यान, भाजयुमोचे प्रदीप गावडे (Pradip Gavade) यांनी एक ट्वीट केले असून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शिवसेनेचा ‘पोपट’ लवकरच पिंजऱ्यात जाईल असं दिसतंय..!असं ते म्हणाले.