Jagdish Mulik | पुण्यातील लोकसभेच्या स्पर्धेतून बाहेर झाल्याने जगदीश मुळीक भावूक, पोस्ट करत म्हणाले…

Jagdish Mulik | बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून मोठ्या नावांचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव, मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातील जागेसाठी भाजपाकडून ३ ते ४ नावांची चर्चा होती. त्यापैकी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्यात स्पर्धा दिसून येत होती. मात्र, भाजपाने उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केल्यानंतर मुरलीधर मोहोळ हेच भाजपाचे पुण्यातील उमेदवार असल्याचे जाहीर झाले.

मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्याने जगदीश मुळीक नाराज झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आता, जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांसाठी भावनिक पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली आहे.

कोणतेही पद नसतानाही माझ्यासाठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे, अशी पोस्ट करत आपण जनतेच्या सेवेत कायमच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार