Jagdish Mulik | उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्यासाठी फक्त कमळ हाच उमेदवार

Jagdish Mulik On Pune BJP Loksabha Candidate | ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीही चुरस असते. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मी काय किंवा मुरलीधरआण्णा काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असतो. त्याच्या विजयासाठीच सर्वजण प्रयत्न करतो. यावेळीही माझ्यासह आपण सर्वांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी पुढील सर्व दिवस कार्यरत राहू’, असे आवाहन माजी आमदार आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरीतील मेळाव्यात केले.

जगदीश मुळीक (Jagdish Mulik) म्हणाले, ‘ही निवडणूक देशासाठी फार महत्वाची आहे. कारण आपण सन २००४ ते २०१४ काँग्रेस-युपीएचे सरकार आणि २०१४ ते २०२४ भाजपचे एनडीएचे सरकार देशात बघितले आहे, अनुभवले आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशात विकासाची कामे केली. पण कोणीही विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. या उलट सर्वसामान्य व्यक्तींशी सहजपणे संवाद साधणारा पंतप्रधान देशवासीयांनी प्रथमच बघितला. काय करणार यापेक्षा काय केलं, हे सांगणारे सरकार मोदी यांनी दिले असल्यानेच त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशवासी उत्सुक आहेत. त्यात आपण वडगावशेरीतील सर्वांनी आपला वाटा उचलूयात आणि कमळ फुलवत मुरलीधर मोहोळ यांनी प्रचंड मताधिक्याने दिल्लीत पाठवू या’.

वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बापूसाहेब पठारे, शिरूर पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जासुद, हवेली बाजार समितीचे माजी उपसभापती राजेद्र कंद, हवेली बाजार समितीचे संचालक नानासाहेब आबनावे, भाजपाचे तालुका अध्य़क्ष आबासाहेब सोनावणे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचरणे, भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सोनावणे, नगरसेवक राहुल भंडारे, सचिन पलांडे, रोहित खैरे, केशव पाचरणे, संतोष भरणे, सचिन सातपुते, अनिल नवले यांच्यासह श्रीगोंदा-पारनेर-हवेली तालुक्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात रहायला असलेले नागरीक, तरूण मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका