विकासकामांच्या शिदोरीमुळेच ‘महाविजय’ निश्चित! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Chandrashekhar Bawakule: भाजपाच्या कार्यकर्त्याने लढलेल्या प्रत्येक लढाईनंतर पक्षाची ताकद वाढली. मोदी सरकारच्या (Modi Government) कल्याणकारी योजना व महायुती सरकारच्या कामांची शिदोरी असल्यानेच आगामी निवडणुकांत ‘महाविजय’ निश्चित आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून तोच पक्षाची संपत्ती आहे, असेही ते म्हणाले.

शनिवारी (ता.६ जानेवारी) ते पुणे लोकसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सशी संवाद साधत होते. यावेळी त्याच्यासोबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, आ. माधुरी मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, माधव भंडारी, शेखर इनामदार, वर्षा डहाळे, मेधा कुलकर्णी, हेमंत रासने, पुनीत जोशी, रवी साळेगावकर, राजेंद्र शिळीमकर, वर्षा तापकीर, महेश पुंडे, सुभाष जंगले, राहुल भंडारी, राघवेंद्र बापू मानकर, जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात विकासाची नवीन संकल्पना साकारली जात आहे. २०४७ मध्ये विकसित भारताचा उद्देश पूर्ण करण्यासाठी २०२४ मध्ये देशवासींनी पुन्हा एकादा भाजपाच्या हाती केंद्रीय सत्तेची चाबी सोपविण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रात भाजपाने ‘महाविजय-२०२४’ हा निश्चय केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. ज्या पक्षाजवळ नरेंद्र मोदींसारखे नेतृत्त्व असेल तेथे विजय निश्चित आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याने तीन तास पक्षकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.

• नमो अॅप ठरणार गेम चेंजर
पंतप्रधान मोदी यांनी मागील नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देणारे ‘नमो अॅप’ प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या मोबाईल डाऊनलोड करावे. विकसित भारत ब्रॅंड अम्बेसिडर झाल्याने भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्याशी थेट जोडण्याची संधी मिळणार आहे. नमो अॅप भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी गेम चेंजर ठरू शकते असे सांगून श्री बावनकुळे यांनी ऍप संदर्भातील प्रात्यक्षिक उपस्थिताना दिले.

• पुण्यात भाजपाचा विजय होणार
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचा विजय होईल. ५१ टक्के मते घेऊन महायुतीचाच उमेदवार जिंकेल. गेल्या वेळेपेक्षाही मोठा विजय पुण्यात होईल, अशी योजना आम्ही तयार केली आहे, असे बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वात राज्यात ४५ प्लस लोकसभा व २२५ प्लस विधानसभा जागांवर महायुतीचा महाविजय साकारणार आहे. यात भाजपाचे सुपर वॉरियर्स विजयाचे शिलेदार ठरतील.

• संक्रातीपासून महायुतीचे मेळावे
संक्रांतीच्या पावनपर्वावर राज्यात १४ तारखेपासून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होणार आहेत. हे सर्व जिल्हास्तरीय मेळावे आहेत. फेब्रुवारी महिन्यात विभागीय मेळावे आहेत. मार्च महिन्यात राज्याचा मेळावा होईल. महायुती बूथस्तरापर्यंत मतदान केंद्रस्तरापर्यंत तालुकास्तरापर्यंत एकत्रित आणि एकजुटीने जनतेपर्यंत जाईल.

• दिवसभर विविध कार्यक्रमांत उपस्थिती
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पुणे दौऱ्यात विविध कार्यक्रमात सहभागी झाले. सकाळी बालेवाडी येथे ज्योर्तिलिंग पादुका दर्शन घेतले. दुपारी दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ आयोजित अटल महाआरोग्य शिबरात सहभागी झाले. गंजपेठ येथे झालेल्या ओबीसी स्नेह मेळावा व बिबवेवाडी येथे राजस्थानी समाज मेळाव्यात सहभागी होत मार्गदर्शन केले. हडपसर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ