Ravindra Berde :  अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डे यांचे निधन

Ravindra Berde passed away – मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवींद्र बेर्डे यांनी आपल्या भूमिकांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते काही काळापासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते.

रवींद्र हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि १९६५ च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली.

चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक, अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाउदे, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा अशा गाजलेल्या मराठी सिनेमांसोबत त्यांनी सिंघमसारख्या सुपरहिट हिंदी सिनेमातही अभिनय केला आहे.

300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

हे ट्रिपल इंजिन सरकार नसून ट्रबल इंजिन सरकार; जयंत पाटील विधानसभेत गरजले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा;अशोक चव्हाण यांची मागणी

Barbeque Chicken Salad तुमच्या तोंडाला आणेल पाणी! रेसिपी नोट करुन घ्या