Nitesh Rane | युवा मोर्चाने संघटनेत खारीचा वाटा न ठेवता सिंहाचा वाटा ठेवावा

Nitesh Rane :  ‘युवा मोर्चा ने संघटनेत खारीचा वाटा न ठेवता कामात सिंहाचा वाटा ठेवावा. कार्यकर्त्याने सचोटीने काम करावे जेणेकरून दिलेली जबाबदारी पूर्ण पार पाडली तरच त्या पदाला न्याय दिला असे लोक मानतील असे प्रतिपादन आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी नियुक्ती पत्र वितरण समारंभात आमदार राणे बोलत होते. पुढे आमदार राणे म्हणाले की जे चुकीचे घडते त्याविषयी प्रकट होऊन व्यक्त होऊन ते जर बरोबर केले तरच आपली किंमत राहते मोदींजींच्या विकासाच्या व्हिजन वर आजचा तरुण विश्वास ठवतो पाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण मोदींच्या मुळे शक्य झाले ज्या लोकांची मोदींजींच्या विषयी बोलण्याची लायकी नाही अशा माणसांनी जर टीका केली त्याला योग्य धडा शिकवला त्याचा आम्हाला अभिमान आहे.आपण अभिमानाने सांगितले पाहिजे की आम्ही मोदींजींचे कार्यकर्ता आहोत जो आत्मविश्वास मोदींजींच्या भाषणात असतो त्याच आत्मविश्वासाने युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने काम केले पाहिजे’.

या वेळी बोलताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की करण मिसाळ (Karan Misal) यांनी युवा मोर्चाचे एक यशस्वी अध्यक्ष म्हणून नाव लौकिक करावे आमदार नितेश राणे यांचा आदर्श घेऊन काम करावे स्वतःची ओळख निर्माण करावी. हा देश युवा आहे या देशात युवा साठी खूप उज्वल आणि अश्वसक काळ मोदींजींच्या मुळे सुरू झाला आहे. यावेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी युवा च्या उलटे वायू असे होते त्यामुळे युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी वायू वेगाने काम करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.

यावेळी बोलताना युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ म्हणाले कीआजचा युवा हा अधिक जागरूक चांगलं वाईट हे त्याला बरोबर कळत त्यामुळे तो मोदींच्या गॅरंटी वर पूर्ण विश्वास ठेवून भा ज पा बरोबर आहे.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार नितेश राणे, शहराध्यक्ष धीरज घाटे,महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे, सरचिटणीस पुनीत जोशी,राघवेंद्र मानकर ,रवींद्र साळेगावकर निवेदिता जोशी आदी उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक आमदार राणे यांच्या हस्ते देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया