बायकोला नर्स बनवण्यासाठी पतीने अडीच लाखाचं कर्ज काढलं, पण ती प्रियकरासोबत झाली फरार

Jharkhand Married Nurse Escapes With Her Lover: ज्योती मौर्य प्रकरणाची भारतीय मीडियात भरपूर चर्चा झाली. आता झारखंडच्या गोड्डात या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. टिंकू यादव नावाच्या डिलिव्हरी बॉयनं पत्नीच्या नर्सिंग कोर्ससाठी अडीच लाखांचं कर्ज काढलं. पत्नीनं नर्सिंग कोर्स पूर्ण केला. मात्र त्यानंतर पतीच्या कृतघ्नपणाची जाण न ठेवताच ती तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. टिंकू यादवनं पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार नोंदवली आहे. (Jharkhand Nurse Dumps Her Labourer Husband Who Financed Her Studies Marries Her Lover In Delhi)

गोड्डा नगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील कठौन गावचा रहिवासी असलेल्या टिंकू यादवचा विवाह बढौना मोहल्ल्यातील प्रिया कुमारीसोबत झाला. पत्नी अभ्यासात हुशार होती. तिची पुढे शिकण्याची इच्छा होती. टिंकू यादवची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण भविष्याचा विचार करुन  त्याने तिला शकुंतला नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यासाठी अडीच लाखांचं कर्ज काढलं. लग्नाच्या दीड वर्षानंतर, अभ्यास सुरू असताना टिंकू यादवनं पत्नी शेजारी राहणाऱ्या दिलखुश राऊतच्या प्रेमात पडली. नर्सिंगचा कोर्स पूर्ण होताच प्रिया कुमारी १७ सप्टेंबरला कॉलेज सुटल्यानंतर प्रियकरासोबत पळाली. त्यांनी दिल्लीला जाऊन कोर्टात लग्न केलं. त्यांचा फोटो टिंकू यादवने सोशल मीडियावर पाहिला, असा घटनाक्रम टिंकूनं कथन केला.

घडलेल्या सर्व प्रकारानंतर टिंकू यादवने पत्नी प्रियाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. . या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी उपेंद्र महतो यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

AAP खासदार संजय सिंह यांना ED ने दीर्घ चौकशीनंतर अटक केली

Gram Panchayat Election : राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक जाहीर

Puneet Balan : अनधिकृत जाहिरात लावल्याने ३.२० कोटीचा दंड; पुनीत बालन यांना नोटीस