देवेंद्र फडणवीसांनी ३०-३५ मिनिटांच्या चर्चेत केली मोठी खेळी; राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली

 पुरंदर :  राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे अत्यंत निकटचे सहकारी अशोक टेकवडे (Ashok Tekwade) हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार (Ashok Tekwade Joins BJP) आहेत. टेकवडे यांनी राष्ट्रवादीला राम राम केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे पुरंदरमधील राजकीय गणितच बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे

.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) उपस्थितीत अशोक टेकवडे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे गेल्या महिन्यांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. अशोक टेकवडे हे सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय होते. त्यांनीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, अशोक टेकवडेंनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. “मी निर्णय घेतलाय की भाजपामध्ये प्रवेश करायचा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला. शिवाय माझी त्यांच्याबरोबर समोरासमोर बैठकही झाली. माझ्या लक्षात आलं की पुरंदरच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काम करण्याची संधी आहे. देवेंद्र फडणवीसांनी ३०-३५ मिनिटांच्या आमच्या चर्चेत मला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला योग्य वाटल्या. म्हणून मी हा निर्णय घेतला”, असं अशोक टेकवडे यावेळी म्हणाले.