चंद्रपूर : मुळची चंदपूर येथील रहिवासी असलेली कार्तिकी अदमाने हि जयपूरमध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेत टाॅप माॅडेल पूरस्काराची मानकरी ठरली आहे. सध्या कार्तिका ही परिवारासह मुबंई येथे स्थायी झाली असून आता ती मिस इंडिया या स्पर्धेसाठी तयारी करत आहे.
कार्तिका चा जन्म चंद्रपूर येथे झाला व नंतर ती परिवारासह विदेशात स्थायी झाली. नंतर ती पून्हा शिक्षणासाठी मुबंईमध्ये आली. सध्या ती मुंबई येथील मुलुंड वझे-केळकर महाविद्यालयात मानसशास्त्र या विषयात पदवी घेत आहे. कार्तिका यांचे कुटुंबिय अनेक वर्षांपासून ऐरोलीचे रहिवाशी आहेत. कार्तिका यांचे दहावीपर्यंत शिक्षण युरो स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले. त्यांनी प्रतिष्ठेच्या एमएमटी ब्रॅण्डच्या अॅम्बेसेडर पदासाठी जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेतला होता.
त्यात देशभरातील स्पर्धकांमधून त्यांची निवड टॉप मॉडेल म्हणून करण्यात आली. कार्तिका यांची आई विद्या पोटदुखे-आदमाने यांनीही सौंदर्य स्पर्धेत विविध पुरस्कार मिळविले आहेत. मिसेस नवी मुंबई, मुंबई क्विन आणि मिसेस कंट्रीवाईड या स्पर्धांचा किताब त्यांनी मिळविला आहे. आपल्या आईच्या पाउलांवर पाउल टाकत कार्तिकी ही सुध्दा माॅडलिंगच्या क्षेत्रात घवघवीत यश संपादित करित आहे. आता तिची निवड मिस इंडिया या स्पर्धेसाठी झाली असून ति या स्पर्धेच्या तयारीला लागली आहे. चंद्रपूरच्या लेकीचे हे यश कौतूकास्पद आहे.