चंद्रकांतदादांनी घेतली बाळासाहेब दाभेकारांची भेट; मविआची डोकेदुखी वाढणार?

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll Election) दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भारतीय जनता पक्षातील सर्वच नेते मंडळींनी पुण्यात ठाण मांडले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न देखील केले जात आहे. यातच काल खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आजारी असताना सुद्धा बापट मैदानात उतरल्याने कसब्यातील वारं फिरल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजपचे जेष्ठ नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dhabhekar) यांची भेट घेतली आहे. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे. दोन्ही बाजूंनी ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असं सांगितलं जात असले तरीही नेमकी काय या भेटीत चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात आहे.

बाळासाहेब दाभेकर हे स्वतः ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र काही कारणास्तव त्यांना माघार घ्यावी लागली. दाभेकर हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आहेत मात्र इतर पक्षातून आलेल्या धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने काहीसे ते नाराज होते. दाभेकर यांनी या निवडणुकीसाठी अर्ज देखील दाखल केला होता. यातच आता या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.