राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाबाबत शिंदे-फडणवीसांनी मानले कोश्यारीचे आभार 

Mumbai – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना निरोप देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राजभवनात गेले होते. याप्रसंगी राजशिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सौ.मनीषा म्हैसकर तसेच राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकाम  करण्यात आले. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये  कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला कायमच राहील. त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची प्रतिमा भेट म्हणून देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले.