क्रांतीज्योती सावित्रीमाईंची पूजा करायला हवी पण सरस्वतीला विरोध कशासाठी ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Nationalist Congress Party leader, former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal) हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. ‘शाळेत शारदा, सरस्वती मातेचा (devi sarswati) फोटो का ? ज्या मातेला आम्ही कधी पाहिलं नाही. कधी आम्हाला शिकवलं नाही. शिकवलं असेल तर केवळ तीन टक्क्यांना शिकवलं. आम्हाला दूर ठेवलं. त्यांची पूजा कशासाठी करायची ? देशातील महापुरूष तुमचे देव असले पाहिजे. देशात महापुरूषांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.

देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं म्हणत भुजबळ यांनी जातीयवादी फुत्कार सोडले. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणीही भुजबळांनी केली. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा जातीयवादी चेहरा समोर आला असून या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या मुद्द्यावरून भुजबळ यांना लक्ष्य केले आहे. एकेकाळी नथुरामचे पुतळे उभारू असे म्हणणारे भुजबळ साहेब हेचं….क्रांतीज्योती सावित्रीमाईंची पूजा करायला हवी पण सरस्वतीला विरोध कशासाठी? ते ज्या साडेतीन टक्क्याबद्दल बोलतायत, त्यातल्याच एकाच्या भिडे वाड्यात सावित्री माईंची शाळा भरली होती हे सोयीस्कर विसरायचं का..? असं वाघ यांनी म्हटलं आहे.