केतकीची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट 2020 सालची; पोलीस तपासात आलं धक्कादायक वास्तव समोर

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने (Actress Ketki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर केलेली ती वादग्रस्त पोस्ट ही 2020 सालची असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी ही पोस्ट तितकी व्हायरल झाली नव्हती, मग आता ती रीपोस्ट (Repost) करून व्हायरल करण्यामागे काही षडयंत्र आहे का याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत.

संबंधित पोस्ट ही 2020 सालीच करण्यात आली होती. पण त्यावेळी पोस्ट करणाऱ्यांना अपेक्षित अशी ती व्हायरल करता आली नव्हती. मग आता ती केतकीच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली आहे की ? त्यामागे काही षडयंत्र (Conspiracy) आहे का ? याचा तपास आता ठाणे पोलिसांनी सुरू केला आहे.

दरम्यान, न्यायालयाकडून केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आज ठाणे पोलीस (Thane Police) केतकी चितळे हिला घेऊन तिच्या कळंबोली इथल्या घरी पोहचले आहेत. केतकीच्या घरातून लॅपटॉप (Laptop) आणि इतर कागदपत्र घेण्यासाठी पोलीस तिच्या घरी दाखल झाले आहेत. लॅपटॉपमध्ये आणखी काही आक्षेपार्ह माहिती मिळतेय का याची तपासणी पोलीस करतील. त्यानंतर तीला पुन्हा ठाणे पोलीस स्टेशनला आणलं जाईल. केतकी अटक करताना पोलिसांनी आधीच तिचा मोबाईल (Mobile) जप्त केला होता.