जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या… दीपाली सय्यद यांची फडणवीसांवर आक्षेपार्ह भाषेत टीका

मुंबई – राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असताना कोणताही राजकीय पक्ष हा वारसा जपताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतळी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याची घटना ताजी असताना आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Shiv Sena leader Deepali Syed)  यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला काल देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तसेच शारीरिक रचनेवरून टीका करणाऱ्या मुख्यंमंत्र्यांना त्याच भाषेत उत्तर दिले होते. दरम्यान, आता दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवर आक्षेपार्ह शब्दात निशाणा साधला आहे. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये दीपाली सय्यद म्हणाल्या की, वजनदारने पुरणपोळी खाके हलकेसे वेगळा विदर्भ मांग्या, दुसरो को हल्का करने के चक्कर मे मामी का युसूफ लकडावाला से ढोंग्या. जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या, अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Deepali Syed’s criticism of Fadnavis in offensive language).