आधी विष घेतलं मग गळ्यावर सुरी ओढली; ‘या’ प्रसिद्ध उद्योगपतीने कुटुंबासह जीवन संपवलं 

Kolhapur : कोल्हापुरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या  केली आहे.

एका प्रकरणामुळे संतोष शिंदे तणावात होते. या प्रकरणात त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणामुळे त्यांना कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. यामुळेच त्यांनी तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.  या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला आहे. या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहिली असून ती गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सुसाईड नोटमधील तपशील समोर आल्यानंतर आत्महत्येचं खरं कारण समोर येणार आहे. मात्र, एका उमद्या उद्योगपतीने अशा भयावह पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.