खुशी कपूर करतेय प्रसिद्ध गायकाला डेट? ‘त्या’ गाण्यात अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख

Khushi Kapoor Dating : खुशी कपूर (Khushi Kapoor) ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही, परंतु खुशीचे सोशल मीडियावर खूप मोठे चाहते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून खुशी तिच्या आगामी ‘द आर्चीज’ चित्रपटासाठी चर्चेत आहे, मात्र सध्या खुशी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. ती पंजाबी गायक एपी धिल्लनला (AP Dhillon) डेट करत असल्याची बातमी आहे.

पंजाबी गायक एपी ढिल्लन हा त्याच्या चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याची गाणी संगीतप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्याने अलीकडेच शिदा कहलोनसोबत त्याचे नवीन सिंगल ट्रू स्टोरीज रिलीज केले. या गाण्याच्या बोलांमध्ये खुशी कपूरचा उल्लेख आहे आणि त्यामुळे प्रत्येक चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्यानंतर दोघांमध्ये डेटिंगच्या अफवा पसरल्या आहेत. जादू हससे तन लागे तू खुशी कपूर हे गाण्याचे बोल आहेत. याचा अर्थ तुम्ही हसता तेव्हा तुम्ही खुशी कपूरसारखे दिसता.