Lahiru Thirimanne Accident | श्रीलंकेला चॅम्पियन बनवणाऱ्या लाहिरू थिरिमानेचा भीषण कार अपघात

Lahiru Thirimanne Accident | श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमाने याचा कार अपघात झाला. अनुराधापुरा येथील थिरापने परिसरात हा अपघात झाला. थिरिमानेची कार एका मिनी ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. थिरिमाने कारमध्ये बसला होता आणि त्या गाडीचे गंभीर नुकसान झाले, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाहिरू थिरामणे याच्या अपघाताचे (Lahiru Thirimanne Accident) फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला.

वास्तविक, श्रीलंकेचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमाने याचा 14 मार्च रोजी कार अपघात झाला होता. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूला तातडीने रुग्णालयात नेले. लाहिरू थिरिमाने याच्या कारचे भितीदायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्याच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि त्याची जखम फार मोठी नाही, ही दिलासादायक बाब आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

लाहिरू थिरिमाने सध्या लेजेंड्स क्रिकेट ट्रॉफी 2024 मध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने एक निवेदन जारी केले की थिरिमाने याचे कुटुंब देखील कारमध्ये उपस्थित होते, परंतु अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि सर्वांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार