जाणून घ्या पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक कसे करावे ?

पुणे – आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे देशातील सर्वात महत्वाचे कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेशी संबंधित सर्व कामांमध्ये या दोन्हींची गरज असते. बँकेत खाते उघडण्यापासून गुंतवणुकीपर्यंत, मुलांच्या शाळेत प्रवेश घेण्यापासून ते घर खरेदी करण्यापर्यंत सर्वत्र या दोन कागदपत्रांचा समावेश आहे.

आयकर विभागाच्या नियमांनुसार, तुमच्यासाठी पुढील एका आठवड्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्च २०२२ पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.जर तुम्ही 31 मार्चनंतरही पॅन आणि आधार लिंक केले असेल, तर तुम्हाला आधी 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे.

पॅन आधार कार्ड लिंक कसे करावेजर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले असेल, तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुमची स्थिती तपासू शकता. सर्व प्रथम प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा म्हणजेच आता नवीन वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal. तळाशी लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.

तुमची स्थिती पाहण्यासाठी हायपर लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन कार्ड तपशील भरावा लागेल. जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्हाला हे कन्फर्मेशन दिसेल की तुमचा पॅन आधार क्रमांकाशी लिंक झाला आहे.

जर तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल, तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आधार लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा तपशील भरावा लागेल. आणि तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल. याशिवाय एसएमएस सेवेचा वापर करण्यासाठी, आधारला 567678 किंवा 56161 वर संदेश पाठवून पॅन कार्डशी लिंक केले जाऊ शकते.