मी ती पोस्ट डिलीट करणार नाही, माझा तो अधिकार आहे – केतकी चितळे 

मुंबई  – प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media) चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान,  शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला काल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता आज न्यायालयात हजर केल्यानंतर तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टात (Court) केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद (Argumentation) केला. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने (Thane Crime Branch) 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली.  गोरेगाव पोलीस स्टेशनचे (Goregaon Police Station) अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर झालेले आहेत.

केतकीने कोर्टात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का ? असा सवाल देखील तिनं केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही (I will not delete the post). माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं.