LokSabha Election 2024 | नणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, बारामतीत वातावरण तापले 

लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याने इतर पक्षांनी आपली उमेदवारी घोषित केली नसल्याचे चित्र आहे.
अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (LokSabha Election 2024) महायुतीत कलगीतुरा सुरु असून माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे. यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजयीमधल्या लढाईत आता वहिनींची एन्ट्री झालीय. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी शर्मिला पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरल्या आहेत.

शर्मिला पवार या अजित पवारांचे छोटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत. सुप्रिया सुळे भावजय असल्यामुळे माझी तिला कायम मदत राहणार आहे असं शर्मिला पवारांनी जाहीर घोषित केलंय.  बारामतीतील एका गावात त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक जणांना सभांना जाऊ नका, धमक्यांचे फोन येतात, मात्र त्याला बळी न पडता सुप्रिया सुळेंनाच मतदान करण्याचं आवाहन शर्मिला पवार यांनी केलंय. त्यामुळे त्या लेकीला, माहेरवाशिणीला पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी मतदारांना यावेळी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय