Kangana Ranaut | कॉंग्रेसच्या नेत्याने कंगनावर टीका करताना पातळी सोडली; चौफेर टीकेनंतर आले ‘हे’ स्पष्टीकरण 

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिची हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी केली आहे. कंगनाच्या नावाच्या घोषणेवर अनेकांची मते समोर येत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाबद्दल काही पोस्ट केले, ज्यानंतर गदारोळ झाला.

आता भारतीय जनता पक्ष कंगनाबद्दल (Kangana Ranaut) केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर हल्लाबोल करत आहे. वाढता वाद पाहून सुप्रिया यांनी ती पोस्ट डिलीट केली, मात्र भाजप नेते स्क्रिनशॉटच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला करत आहेत. सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाला मंडीतून तिकीट मिळाल्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. कंगनाचा बिकीनीतील फोटो टाकत सुप्रिया यांनी लिहिले, बाजारात आज काय भाव सुरु आहे हे कोणी सांगू शकेल का?  सुप्रियाने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती.

सुप्रिया श्रीनेट यांच्या या पोस्टवर भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस तजिंदर पाल सिंग बग्गा म्हणाले की, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय सुप्रिया श्रीनेट या काँग्रेसचा नेहरूवादी चेहरा दाखवत आहेत. तर शेहजाद पूनावाला म्हणाले की, हे द्वेषाच्या पलीकडे आहे. सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनावर केलेली टिप्पणी घृणास्पद आहे. प्रियांका गांधी बोलणार का? खरगेजी त्यांना बडतर्फ करणार का? हातरसची लॉबी आता कुठे आहे? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, सुप्रिया श्रीनेट यांनी सोमवारी संध्याकाळी X वर जारी केलेल्या स्पष्टीकरणात म्हटले – माझ्या मेटा अकाऊंटवर (फेसबुक आणि इंस्टाग्राम) दुसऱ्या कोणीतरी प्रवेश केला, त्यानंतर एक अतिशय अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट केली गेली. मात्र, ती पोस्ट काढून टाकण्यात आली आहे. जे मला वैयक्तिकरित्या ओळखतात त्यांना हे समजते की मी कोणत्याही महिलेबद्दल असे बोलू शकत नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय